27 Jul 2026, Mon

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून सेवा महोत्सवांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. २१ जुलै :- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
समाज स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. जनसेवा व समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी नगराध्यक्षा अँड. प्रणोती निंबोरकर, नगरपरिषद बांधकाम सभापती तथा भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, नगरसेवक सागरजी निंबोरकर, नगरसेविका अर्चनाताई निंबोड, नगरसेविका साक्षीताई बोलूवार, नगरसेवक केशवजी मडावी, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष दिनेशजी नवघडे, विनोदजी देवजवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!