26 Oct 2026, Mon
Breaking

गणेशोत्सवानिमित्त भोलूभाऊ सोमनानी व मित्र परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

वैरागड : – येथील सामाजिक कार्यकर्ते भोलुभाऊ सोमणानी व मित्र परिवाराच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भोलूभाऊ सोमणानी परिवाराच्या घरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली असून, गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता गोपाल काला कार्यक्रमाचे, तर सायंकाळी ५ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून गणरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले.

तसेच दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता गणेश विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गणेशभक्तांनी या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती सोमणानी परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

स्थळ : भोलुभाऊ सोमणानी यांच्या घरासमोरील आवार, वैरागड, ता. आरमोरी, जि. गडचिरोली.

आयोजक : भोलुभाऊ सोमणानी व मित्र परिवार, वैरागड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!