राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त सेवा महोत्सव २०२६ ..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.
गडचिरोली :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे भव्य सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
या सांस्कृतिक महोत्सवात पुण्याचे प्रसिद्ध गायक श्री. राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच भारुड, गोंधळ, कोळीगीत, जोगवा, धार्मिक नृत्य, देशभक्तीपर गीत आणि महापुरुषांच्या जीवनगाथेवर आधारित नृत्याविष्कारांनी सभागृह देशभक्ती, संस्कृती आणि परंपरेच्या रंगांनी भारावून गेले.
याच कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्यात आले.
संस्कृतीचे जतन, देशभक्तीची प्रेरणा आणि वीर जवानांप्रती कृतज्ञता या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

