30 Jul 2026, Thu

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण..

गडचिरोली, (जिमाका) :- जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह, गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी कैद्यांची आरोग्य तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना हेपाटायटिस-बी प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. तसेच हेपाटायटिस-बी व सी आजारांची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, वेळेवर निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार हेपाटायटिस-बी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा खुले कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे, वरिष्ठ कारागृह अधिकारी वैभव आत्राम व अन्य अधिकारी उपस्थित होते आरोग्याविषयी जनजागृती वाढण्यास आणि हेपाटायटिस प्रतिबंधाला चालना मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!