13 Sep 2026, Sun

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदल..

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार..

गडचिरोली :- जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सदर सेवा सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. दुपारी १२.०० ते ४.०० या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावे, तसेच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजन करावे व संबंधित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!