10 Jun 2026, Wed

खरीप हंगाम २०२६ विशेष मोहिमेसाठी कृषी विभागाचे आवाहन..

गडचिरोली दि.08:- महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०२६ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, चालू हंगामात ‘एल निनो’ (El Niño) सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या पावसावर आणि पर्यायाने कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने “एल निनो” मुळे होणाऱ्या संभावित परिणामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता या मोहिमेअंतर्गत विविध आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मोहिमेमध्ये धान, कापूस व तूर पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बीजप्रक्रिया, सरी-वरंबा पद्धत, जैविक खते, ट्रायकोकार्डचा वापर आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक अधिकारी यांना गावनिहाय लक्षांक निश्चित करून ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन, प्रात्यक्षिके व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव व यशोगाथा देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मोहिमेचे नाव-

धान पिक :- जैविक बिजप्रक्रिया (Biofertilizer),गादी वाफ्यावर पऱ्हे घेणे, पट्टा पद्धतीचा वापर करणे, पऱ्हे टाकल्यानंतर २०-३० दिवसात रोवणी करणे, रोवणीनंतर ट्रायकोकार्ड ३० दिवसात वापर करणे, हिरवळीचे खताचा वापर, अॅझोला वापर, खोडकिडा (Scirpophaga incertulas) करिता कामगंध सापळ्याचा वापर करणे, DSR/शून्य मशागत तंत्रज्ञान/Drum Seeding/श्री पद्धत कापूस पिक:- सरी वरंबा (HDPS)(९०x३० से.मि.), लागवडीचे वेळी खताची मात्रा देणे (Besal dose), शेंडा खुडणे, ट्रायकोकार्डचा वापर सोयाबीन पिक – सरी वरंबा BBF पद्धतीचा वापर करणे,

आंतरपिक पद्धत-तूर (४:१), बिजप्रक्रिया –बुरशीनाशक ट्रायकोडर्मा चा वापर “खरीप हंगाम २०२६ विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागास सहकार्य करून विविध प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा,” असे आवाहन श्रीमती प्रिती म.हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!