12 Sep 2026, Sat

गडचिरोलीत ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे

गडचिरोली(जि वि मा अ) 12:- जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृह येथे ‘फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नऊ परिचारिकांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन_ या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके आणि जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना मान्यवरांनी खालील विचार व्यक्त केले:

श्री सुहास गाडे (CEO) __ त्यांनी आरोग्य विभागाच्या बळकटीकरणात परिचारिकांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. वर्षा लहाडे: परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रताप शिंदे: “तुम्ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेता, त्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे,” असे आवाहन त्यांनी सर्व परिचारिकांना केले.

फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार विजेत्यांची यादी___कार्यक्रमात एकूण ९ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार पुरस्कार प्रदान करण्यात आले:

१. आरोग्य सेविका श्रेणी:__

प्रथम:अर्चना मुऱ्हारी मडावी (प्रा. आ. केंद्र, पुराडा)

द्वितीय: रजनी कांचनलाल वासनिक (प्रा. आ. केंद्र, जिमलगट्टा)

तृतीय: वैशाली भिवाजी झाडे (प्रा. आ. केंद्र, जिमलगट्टा)

२. आरोग्य सहाय्यिका श्रेणी:

प्रथम:शोभा अरूण गेडाम (प्रा. आ. केंद्र, मालेवाडा)

द्वितीय:छाया नरेश गजभिये (प्रा. आ. केंद्र, कोटगुल)

तृतीय: विद्या हनुमंतराव ऊईके (प्रा. आ. केंद्र, पुराडा) ३. परिसेविका / अधिपरिचारिका श्रेणी:

प्रथम: नजमा वाहीद बेग (ग्रा. रूग्णालय, भामरागड)

द्वितीय: नंदा मनोहर वालको (जिल्हा सा. रूग्णालय, गडचिरोली)

तृतीय: सुनंदा रमेश चांदेकर (उपजिल्हा रूग्णालय, अहेरी)

इतर विशेष सन्मान__

फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कारांव्यतिरिक्त, एकात्मिक रोग सर्वेक्षण (IDSP) कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य सेविका, सेवक आणि फार्मासिस्ट यांनाही अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच, मुंबई येथे झालेल्या DHPE प्रशिक्षणात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दोन आरोग्य सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला:वश्रीमती स्मिता लोणारश्रीमती मीना राऊत या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ. प्रताप शिंदे

जिल्हा आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!