कम्मासूर गाववाशीय विविध समस्या घेऊन माजी जि.पं. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिले निवेदन.
न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी अहेरी..
अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वरुन अवघ्या 20 कि. मी. अंतरावर असलेल्या पेठा पोलीस स्टेशन हद्दीतील 3 कि. मी. अंतरावर असलेल्या कम्मासूर गावात स्वतंत्र्यापासून अजूनही मूलभूत सोयी सुविधेपासून कोसो दूर असलेल्या कम्मासूर हा गाव विविध समस्याच्या विडक्यात सापडलेला आहे. या परिसरात रस्ते, नाले, नाल्यावर पूल नाही, चालायला रस्ता नाही, पावसाळा आला की, पूर्णपणे चिखलाने माखलेला रस्ता, आजार पडला की, खाटेचा कावळ करून ऍम्ब्युलन्स करून 3 किमीचा पायी प्रवास गाठावा लागत असतो. कधी, कधी उपचारा अभावी वाटेतच रुग्णांना प्राण घमावावा लागत असतो. या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात अडचण__ तालुक्यात अहेरी, किंवा आलापल्लीला जायला खूप मोठी तारेची कसरत करावी लागत असतो. आता पर्यंत दोन नागरिक पाण्यात वाहून गेल्याचा तेथील गावकरण्याचा म्हणणे आहे. तात्काळ या पुलाची मागणी मंजूर करून बांधकाम करण्यात यावी. या गावात नेहमीच पाण्याची टंचाई भासत असल्याने तात्काळ पावसाळ्याआदी नळ योजना सुरु करण्यात यावी. कम्मासूर गावात 90 टक्के आदिवासी बहुल असल्याने या ठिकाणी गोटूल भवन बांधकाम करण्यात यावी.आदी विविध समस्या घेऊन कम्मासूर गाववाशीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी कम्मासूर गाव वाशीय क्रितिमंत पानेमवार, रगूपती आलाम, सुरेश बोडेंकी, रमेश येरमा,चुकाय्या चिंता, समय्या मडावी, श्रीनिवास बोडेंकी, संतोष मडावी, क्रिष्णा सडमेक, सुनील आलाम कम्मासूर गाव वाशीय उपस्थित होते.

