27 Jul 2026, Mon

इंजि. प्रमोदजी पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि.२ जुलै २०२६ :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी श्री.इंजि. प्रमोदजी पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माजी खासदार श्री.रामदासजी तडस यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.

नियुक्तीपत्रानुसार, यापूर्वी गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले आशीष अरुण पिपरे यांची नियुक्ती काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली असून, त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर आजपासून पुढील आदेशापर्यंत इंजि. प्रमोदजी पिपरे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कार्यकारिणीलाही मान्यता देण्यात आली आहे.

इंजि. प्रमोदजी पिपरे हे यापुर्वी सुद्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करीत होते.तेली समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा, प्रेम व संपर्क तसेच जिल्ह्यातील प्रवास आणि अनुभव असल्याने पुन्हा त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व तेली समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!