12 Sep 2026, Sat

मोठी दुर्घटना टळली ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.

महात्मा फुले चौकात धावत्या एसटी बसच्या मागील छताचा भाग कोसळला..

न्यू विदर्भ केसरी / एटापल्ली प्रतिनिधी..

एटापल्ली :- गडचिरोली –बोलेपल्ली –अहेरी मार्गावर धावणाऱ्या MH-07 C-9483 क्रमांकाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या मागील छताचा लोखंडी भाग महात्मा फुले चौकात अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस चौकातून जात असतानाच छताचा भाग अचानक खाली कोसळल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस सुरक्षित थांबविण्यात आली आणि संभाव्य अनर्थ टळला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी एसटी महामंडळाच्या देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जीर्ण झालेल्या बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

नागरिकांची प्रमुख मागणी : ▶️ संबंधित बसची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी.

▶️ निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

▶️ राज्य परिवहनच्या सर्व बसांची विशेष तपासणी मोहीम राबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी.

“वेळीच दखल घेतली नाही, तर पुढील वेळी मोठी दुर्घटना घडू शकते,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!