27 Jul 2026, Mon

सामाजिक कार्यकर्त्या सौ. शितलताई भोलूभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

वृद्ध माता-पित्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य; महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप..

“माणुसकीचा घास” अभियानांतर्गत अन्नदान; समाजापुढे आदर्शवत सामाजिक संदेश..

न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी..

गडचिरोली, :- समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शितलताई भोलूभाऊ सोमनानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू व अनाजचे वाटप करण्यात आले.

वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस न राहता, समाजातील गरजू आणि निराधार घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होत आहे.

मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ माता- पित्यांना दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचे व अनाज वाटप (वितरण) करून त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त केली आहे.

आजच्या धावपळीच्या युगात वृद्धांची सेवा हीच खरी समाजसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

या उपक्रमाबद्दल मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत सौ. शितलताई भोलूभाऊ सोमनानी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक, कर्मचारी, स्वयंपाकी तसेच आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर लगेच गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्कीट, केळ, जिलेबी आणि पेसेंटच्या (सोबत असणाऱ्या) नातेवाईकांना ‘एक घास माणुसकीचा’ उपक्रमांतर्गत भोजन (अन्नदान) वाटप___

सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शितलताई भोलूभाऊ सोमनानी यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

१२:३० वाजता इंदिरा गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी विशेष सेवाकार्य आयोजित करण्यात आले. त्यामध्ये ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप (अन्नदान) करण्यात आले, रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जपत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपक्रमात सौ. शितलताई भोलूभाऊ सोमनानी, सौ. गौरीताई सोमनानी माजी सरपंच वैरागड, फुलचंद वाघाडे,  सचिन उमरे, संजय मेश्राम ‘माणुसकीचा घास फाउंडेशन’ तथा माजी नगरसेवक न. प. गडचिरोली, दवाखान्यातील डॉक्टर, सिस्टर, पेसेंट, व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यातच आहे,” असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून शितलताई भोलूभाऊ सोमनानी यांच्या कडून समाजापर्यंत पोहोचत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!