28 Oct 2026, Wed
Breaking

आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची जाहिरात रद्द ; 

नव्या शासन शुद्धीपत्रकानुसार पुढील प्रक्रिया होणार..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. जुलै २०२६(जिमाका): गडचिरोली जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व २ नगरपरिषद / नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात आली आहे.

इलेक्टॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने ९ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र मंजुरी प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

सुधारित शासन निर्देशांनुसार पुढील कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, इच्छुकांनी नवीन अधिकृत जाहिरात व सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!