न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
कुरखेडा :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुका कुरखेडा यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनीही रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल गिरणारे तसेच त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा सचिव रूपाली कावळे, राकेश चौहान, श्रीकांत नागीलवार, धनंजय नाकाडे, मंगेश दखणे, रितेश माखिजा, चेतन गाहणे, नितेश लांजेवार, मनोज भैय्या, किशोर खुणे, डॉ. पुरुषोत्तम नेवारे, रोहन सूर्यवंशी, मोहन माळी, अनिल गिरनाडे, अतुल वालीखाये, निखिल लांडगे, राहुल पाल, विनोद श्रीरामे, मिराज बेग, सूरज निहारे, आशुतोष दांडेकर, भामेश्वर दलावर, अंकुश ठाकूर आदींचा समावेश होता.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष न प सभापती सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर आणि डॉ. जगदीश बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नगरसेविका अल्का गिरडकर, महामंत्री जयश्री मडावी, अहिल्याताई लोथे भाजपा महिला महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर, मोनेश मेश्राम, रोशन सय्यद, भाग्यवान जनबंधू, तुषार कुथे, लक्ष्मण धुळसे, बंटी देवढगले मंगेश मांडवे लोमेश किरसाण राहुल गिरडकर तसेच कुरखेडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे व कल्पना भट, निशा चचाने (NCD), श्यामला कांबळे (ICTC), दीक्षा जोगे (आरोग्य मित्र), प्रज्वल गेडाम तसेच गडचिरोली येथील रक्त संक्रमण पथकातील राहुल सिडाम, प्रफुल राऊत, शरद बांबोडे, जावेद शेख आणि निकेश भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमातून वाढदिवसाचे औचित्य सामाजिक सेवेशी जोडत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

