पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला ; नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोसरे यांची प्रशासनाकडे मागणी.
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
पुसुकपल्ली:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पुसुकपल्ली, टेकमपल्ली आणि संन्ड्रा या तीन गावांचा समावेश असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोसरे यांनी केली आहे.
सध्या पावसाळा सुरू असून या तीनही गावांमध्ये विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून, डेंग्यू, मलेरिया यांसह विविध साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने वॉर्ड क्रमांक ५ मधील पुसुकपल्ली, टेकमपल्ली आणि संन्ड्रा या गावांमध्ये तातडीने औषध फवारणीची मोहीम राबवावी, अशी मागणी राकेश कोसरे यांनी केली आहे.
पावसामुळे सखल भाग, नाल्या, गटारी तसेच इतर ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या पैदाशीस पोषक वातावरण निर्माण होत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ फवारणी करून न थांबता साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, नाल्या व गटारींची नियमित स्वच्छता करणे आणि डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक असल्याचे राकेश कोसरे यांनी म्हटले आहे.
विहिरी व बोअरवेलचे निर्जंतुकीकरण करा___
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता लक्षात घेता, वॉर्ड क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या पुसुकपल्ली, टेकमपल्ली आणि संन्ड्रा या गावांतील विहिरी व बोअरवेलची तपासणी करून आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी व स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या तीनही गावांमध्ये विशेष स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आजार पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा__
डेंग्यू, मलेरिया व इतर साथीचे आजार पसरण्याची वाट न पाहता प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वॉर्ड क्रमांक ५ मधील तिन्ही गावांमध्ये तातडीने औषध फवारणी करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवावे. तसेच विहिरी व बोअरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोसरे यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेतल्यास संभाव्य आरोग्य संकट टाळता येऊ शकते. त्यामुळे नागेपल्ली ग्रामपंचायत प्रशासनाने वॉर्ड क्रमांक ५ मधील पुसुकपल्ली, टेकमपल्ली आणि संन्ड्रा या तिन्ही गावांमध्ये तात्काळ फवारणी मोहीम राबवून, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, नाल्या-गटारींची स्वच्छता करावी तसेच विहिरी व बोअरवेलचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी राकेश कोसरे यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना सुरू कराव्यात. संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन वॉर्ड क्रमांक ५ मधील तिन्ही गावांमध्ये विशेष स्वच्छता, फवारणी आणि निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोसरे यांनी केली आहे.

