13 Sep 2026, Sun

दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची संधी..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. 

गडचिरोली, दि. २४ :- दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

या पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली असून ३१ जुलै २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज व नामांकने केवळ ऑनलाइन स्वीकारली जात असून, अर्ज www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर सादर करावेत.

पुरस्कारासंदर्भातील मार्गदर्शक सूचना व पात्रता निकष “www.depwd.gov.in” या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पात्र व्यक्ती व संस्थांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!