27 Jul 2026, Mon

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांकडे दिला राजीनामा..

NEET-UG परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.

नवी दिल्ली | प्रतिनिधी :- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला. NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य सर्वोच्च असल्याचे नमूद करत, देशातील परिस्थितीचा गैरफायदा कोणालाही घेऊ न देता विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून NEET-UG परीक्षा वादावरून विविध विद्यार्थी संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!