28 Jul 2026, Tue

Invalid BOQ’ मुळे कंत्राटदारांना डावलने खपवून घेणार नाही?..

दिना प्रकल्पाची चुकीची निविदा प्रक्रिया रद्द करावी__
डॉ. प्रणय खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्प अंतर्गत विश्रामगृह दुरुस्तीच्या कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप होत असून, ‘Invalid BOQ’ या तांत्रिक बिघाडामुळे कंत्राटदारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित निविदा रद्द करून पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे वतीने करण्यात आलेली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, निविदा क्र. २६/२०२६-२७ (टेंडर आयडी: 2026_CEWRN_1295957_1) अंतर्गत दिना प्रकल्पातील विश्रामगृह दुरुस्तीचे काम प्रसिद्ध करण्यात आले होते. या निविदेत सहभागी होण्यासाठी कंत्राटदार वि. बी. बोम्मवार व आर. व्ही. शेट्टे,पी एम वायलालवार व इतर कंत्राटदार यांनी अर्ज केला होता. त्यांच्या खात्यातून ईएमडी (EMD) रक्कमही कपात झाली होती.
मात्र, निविदा सादर करताना बीओक्यू (BOQ) अपलोड करताना सतत ‘Invalid BOQ’ असा तांत्रिक त्रुटीचा संदेश येत असल्याने अर्ज पूर्ण करता आला नाही, असा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. याबाबत त्यांनी विभागीय कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तक्रारही नोंदवली होती, परंतु कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही कंत्राटदारांना जाणीवपूर्वक सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी तांत्रिक अडथळा निर्माण केल्याची आरोप केले जात आहे. त्यामुळे संबंधित निविदा रद्द करून ती नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी, प्रक्रियेत सर्वांना सहभागी करावे अशी मागणी संबंधित कंत्राटदार यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि निविदा प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. या आरोपांमुळे पाटबंधारे विभागाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित झालेले निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून नवीन नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, भूषणा खेडेकर, राणी गोपशेट्टीवर, गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, दीपक सातपुते, चामोर्शी तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, सचिव संतोष बुरांडे, दिनेश मुजुमदार व संघटना पदाधिकारी प्रवीण गेडाम पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!