गडचिरोली (दि. १२ मे २०२६):- राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोली अंतर्गत ‘महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर मोहीम’ निमित्त आज गडचिरोली येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवर__ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशांत सोनावणे, भौतिकोपचार तज्ज्ञ दीक्षा सुनोरखान, आणि अधिपरिचारिका मंजुषा बंड उपस्थित होत्या.
आरोग्य तपासणी व मार्गदर्शन__ या शिबिरादरम्यान वृद्धाश्रमातील सर्व १७ निवासी वृद्धांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. अधिपरिचारिका स्नेहा गेडाम यांनी वृद्धांच्या उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी केली.
डॉ. प्रेरणा राऊत यांनी आरोग्याची काळजी घेण्यासोबतच तंबाखू व तंबाखूजन्य सुगंधी पदार्थांच्या दुष्परिणाम यासंबंधी माहिती दिली.

