10 Jun 2026, Wed

खरपी ( टेंभाचक) येथील हॅन्डपंप (बोरिंग) अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत..

ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती कोणीही लक्ष द्यायला तयार नाही..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

वडधा / खरपी :- आरमोरी तालुक्यातील वडधा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा- खरपी (टेंभाचक) येथील हॅन्ड पंप (बोरिंग)अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असून ना ग्रामपंचायत लक्ष देत आहे, ना ही पंचायत समितीचे अधिकारी- पदाधिकारी त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याची समस्या जाणवत आहे, तर पाणी आणायचं कुठून असा प्रश्न गावकरी प्रशासनाला विचारत आहेत. गावातील प्रतिष्ठित नागरिक रेमाजी चुधरी यांनी या समस्या संबंधित अनेक वेळा ग्रामपंचायतमध्ये तथा पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले की सदर खरपी येथील मुख्य रोडवर असलेले हॅन्डपंप अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे त्याची दुरुस्ती करून गावकऱ्यांना व मुख्य रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पाण्याची सोय होईल यासाठी दुरुस्त करून द्या अशी मागणी अनेक वेळा केली. परंतु ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ना पंचायत समितीचे अधिकारी या बाबीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तथा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मागणी केली आहे की, सदर बंद अवस्थेत असलेले हँडपंप (बोरिंग ) दुरुस्ती करून गावकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!