10 Jun 2026, Wed

एटापल्ली वन विभागाने फिरवली जेसिबी..

न्यू विदर्भ केसरी / तालुका प्रतिनिधी भामरागड..

भामरागड :- वनविभागातील एटापल्ल्ली वनपरिक्षेत्रातील एटापल्ली नियत क्षेत्रामध्ये वनजमिनीवर अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आल्याने वनविभागाकडुन तात्काळ कार्यवाही करुन अतिक्रमण हटविण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि एटापल्ली नियत क्षेत्रातील कक्ष क्र 345 मध्ये दोन ठिकाणी व कक्ष क्रमांक 348 मध्ये एका ठिकाणी शेती करण्याच्या व घर बांधण्याच्या उददेशाने वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर अतिक्रमणधारकांना वनअधिकाऱ्यांनी पुरेसा वेळ देवुन अतिक्रमण केलेल्या वनजमिनीचे वैध दस्ताऐवज सादर करण्यास सांगितले असता संबंधिता कडुन कोणतेही वैध दस्ताऐवज सादर न केल्याने वनाधिकाऱ्यांनी कारवाई करून अतिक्रमण हटविले.

सदरची कारवाई ही श्री. शैलेश मिना उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग श्री. दिपक रामटेके सहायक वनसंरक्षक भामरागड वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती निलीता खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली व परिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!