धानोरा तालुक्यातील रांगी-जांभळी मार्गावरील पूल बांधकामाचे भिजत घोंगडे ; दीड दशकांनंतर ही समस्या कायम?
राज्य सरकारने सदर पुलियाचे बांधकाम करावे, अन्यथा विराट जनआंदोलन – प्रणय खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना…
न्यू विदर्भ केसरी / तालुका प्रतिनिधी धानोरा..
धानोरा :- देशाला स्वातंत्र्य म्हणून सात दशकाचा कालावधी उलटूनही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभळी, दवंडी परिसरातील नागरिक आजही मूलभूत सोयी सुविधा पासून संघर्ष करीत असताना दिसत आहेत. धानोरा तालुक्यातील रांगी, जांभळी मार्गावरील नाळेवाही नाल्यावरील अर्धवट अवस्थेत गेल्या दीड दशका पासून येथील पुलियाचे बांधकाम रखडलेले आहे. सदर बांधकाम तात्काळ सुरू न केल्यास येथील स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण छेडण्याचा व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी यांना व स्थानिक प्रशासनाला सदर नाल्यावरील पुलाची उभारणी करण्याकरिता वारंवार मागणी करूनही सदर पूल उभारणी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. स्थानिक शासन लोकप्रतिनिधीकडे वारंवार साकळे घालूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने स्थानिक ग्रामवासीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. तात्काळ पुलियाचे बांधकाम सुरू करावे अन्यथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर गावकऱ्यांना प्रशासनाकडून वर्षानुवर्षापासून केवळ आश्वासनाची खैरातच मिळाली आहे. आजपर्यंत लोकप्रतिनिधी शासन- प्रशासन यांच्यासोबत गावकऱ्यांनी वारंवार पत्र व्यवहार करूनही सदर काम हे मंजूर झाले नाही. व सदर नाल्यावर पुलियाचे बांधकाम आजही अर्धवट अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील रांगी-जांभळी- दवंडी या गावातील नागरिकांना रांगी येथील आठवडी बाजार, बँक व्यवहार, तसेच जिल्हा कार्यालयीन कामासाठी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करावा लागत आहे असे प्रत्यक्ष भेटी दरम्यान जांभळीवासीय नागरिकांनी मानवाधिकार संघटनेस दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.
यावेळी येथील अनंती पदा सरपंच जांभळी, आसाराम ताडाम सदस्य, देवराव उसेंडी सदस्य, रागीनी उसेंडी, सदस्य, अनुसया ताडाम सदस्य बारीकराव उसेंडी, देवनाथ कुमोटी, निरंगशहा हलामी, नेताजी हुरा, काशिनाथ गोटा, राजू टेकाम,श्रीराम ताडाम, बाबुराव उसेंडी,मनिराम हारामी, रेवन उसेंडी, सुरेश परसा, मनीराम पदा व गावकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

