10 Jun 2026, Wed

जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे प्रवेश प्रक्रियेत घोळ..

प्राचार्य ममता लांजेवार यांचा मनमानी कारभार ; पालकांचे  गंभीर आरोप ..

न्यू विदर्भ केसरी / मुख्य संपादक फुलचंद वाघाडे…

चामोर्शी / घोट :- जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या सहावीच्या परीक्षेची निकालाची माहिती पालकांना १७ मार्च २०२६ ला मिळाली व त्यानंतर ६ एप्रिल २०२६ ला ४० विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले व ९ एप्रिल २०२६ ला ४० विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. यामध्ये पालकांना सर्व डॉक्युमेंट घेऊन यायला सांगितले त्यावेळेस कार्यालयामध्ये असलेले बाबू राजू जोंधळे यांनी सर्व डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपला प्रवेश अर्बन मध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळेस प्राचार्य मॅडम ममता लांजेवार कार्यालयात हजर नव्हत्या. त्यानंतर २ मे २०२६ ला पालक मुलांच्या प्रवेशा संदर्भात विचारणा करण्यासाठी सकाळी नऊ वाजता विद्यालयात येऊन ऑफिसमध्ये भेट दिली असता कार्यालयातून सांगितले की प्राचार्य मॅडमला घरी जाऊन भेटा . घरी गेल्यानंतर प्राचार्य मॅडम रागवून बोलल्या की घरी यायला तुम्हाला कोण सांगितलं शाळेत जा मागे मी येते. सर्व पालकांनी कार्यालयात दोन तास वाट पाहिली परंतु प्राचार्य ममता लांजेवार आल्या नाही म्हणून सर्वांनी वैतागून ६ मे २०२६ रोजी माहितीचे अधिकारात अतिशीघ्र माहिती मिळावी म्हणून अर्ज केला. परंतु प्रवेशाबद्दल कोणतीही माहिती पालकांना कळाली नाही व त्यामुळे सर्व पालकांनी मिळून जिल्हातील पत्रकार व लोकप्रतिनिधीना माहिती दिली. त्या वेळेस प्राचार्याची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी टाळाटाळ केली. दिनांक ८ मे २०२६ रोजी सर्व पालक वर्ग विद्यालयात जाऊन काय ते स्पष्ट आम्हाला लिहून द्या. अन्यथा आमच्या मुलांना प्रवेश द्या म्हणून नवोदय विद्यालय घोट येथे गेले असता प्राचार्य ममता लांजेवार हजर नव्हत्या. त्यावेळेस प्रभारी प्राचार्य यांना भेटून त्यांच्या सूचनेनुसार परीक्षा प्रभारी कार्यालय अधीक्षक यांना भेटून विनंती केली असता आमच्या पाल्यांची शाळा युडायस पोर्टलवर अर्बन दाखवत असल्यामुळे ऍडमिशन होऊ शकत नाही असे सांगितले.

सत्यता अशी की विद्यार्थी ग्रामीण मध्ये प्रवेश झाल्याचे नवोदय विद्यालय समितीच्या निकाल यादीमध्ये असून आणि तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी दिनांक ७ एप्रिल, १० एप्रिल व १३ एप्रिल २०२६ ला सदर परिसर हा ग्रामीण असल्याचे दाखला देऊन सुद्धा प्राचार्य श्रीमती लांजेवार यांनी प्रवेश देण्याचे टाळाटाळ करून वेटिंग लिस्ट वाल्यांना बोलावून त्यांची ऍडमिशन प्रक्रिया देखील सुरू केली. यामुळे सर्व ११ पालकांनी रिट पीटिशन क्रमांक ४१२२/२०२६ टाकली त्यावर उच्च न्यायालय नागपूर बेंच येथे ११ मे २०२६ रोजी सुनावणी झाली व १२ मे २०२६ ला नवोदय विद्यालय समिती व प्राचार्य यांना अन्यायग्रस्त मुलांसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी स्टे मिळाला.

नवोदय विद्यालय ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने बनवलेले शाळा असल्यामुळे त्या शाळेत असलेले प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी याकडे लक्ष देऊन गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. परंतु प्राचार्य ममता लांजेवार यांच्या वागण्यात असे दिसून येते की त्या दडपण देऊन मनमानी कारभार चालू केल्याचे स्पष्ट होते.

याआधी जवाहर नवोदय विद्यालय घोटचे नाव फार चांगले म्हणून घेत होते__  ममता लांजेवार प्राचार्य यांचे जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे प्रभार घेतल्यापासून त्या नेहमी वादाच्या भोवऱ्यातच अडकलेले आहेत. कधी त्यांनी काम न केलेल्या व्यक्तीला अनुभव सर्टिफिकेट दिल्याचे कळते तर कधी विद्यार्थ्यांच्या लहान लहान चुकांवर देखील त्यांचे केस पकडून मारल्याचे कळते. या विद्यालयामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इयत्ता दहावी व बारावी मध्ये विद्यार्थी सतत शंभर टक्के निकाल देत होते.

पण लांजेवार मॅडम यांच्या कार्यकाळात एका वर्षात विज्ञान विषयात दोन विद्यार्थी फेल व गणित विषयात एक विद्यार्थी फेल असा दहावी सीबीसीचा निकाल आहे. करिता अन्यायग्रस्त पालकांना योग्य न्याय मिळून जवाहर नवोदय विद्यालय घोटला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व मा. पलकमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालवे अशी विनंती पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!