10 Jun 2026, Wed

संकल्प फाउंडेशनची रुग्णवाहिका दुर्गम भागातील रुग्णांसाठी ठरणार नव संजीवनी…

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांचे प्रतिपादन ; रुग्ण सेवेकरीता रुग्णवाहीकेचे लोकार्पण..

न्यू विदर्भ केसरी / तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

कुरखेडा :– संकल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा वतीने अटीतटीच्या परिस्थितीत रुग्णांची होणारी गैरसोय टाळता यावी व शहरां प्रमाणेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना अडचणीच्या वेळी त्वरित पोहचता यावे आणि उपचारा अभावी कोणत्याही रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये. त्यांनाही वेळेत आणि तत्परतेने उपचार मिळावेत याकरीता कुरखेडा तालूक्यात अत्याधुनिक सोई सुविधा युक्त रूग्न वाहीका उपलब्ध करून दिली आहे. ती रुग्णवाहिका दुर्गम व ग्रामीण भागातील अपघातग्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार असे प्रतिपादन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले.

मागील ८ वर्षांपासून संकल्प फाउंडेशन समाजसेवी संस्थेचा वतीने तालूक्यात विविध आरोग्य शिबीरासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजसेवेचा कार्यात अनेकदा रूग्नांची रूग्नवाहीका अभावी हेळसांड होते असा अनूभव अनेकदा येत होता सदर अडचण लक्षात घेत संकल्प फाउंडेशनने स्वता पूढाकार घेत रूग्नवाहीका उपलब्ध करून दिली. दिनांक 12 मे 2026 मंगळवार रोजी रूग्नवाहीकेचे लोकार्पण उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या हस्ते येथील किसान सभागृहाचा पटागंणात करण्यात आले. याप्रसंगी पोलिस ठाणेदार महेंद्र वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, संकल्प फौंडेशनचे डॉ. जगदीश बोरकर, सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, प्रा. डॉ. दशरथ आदे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी विवेक निरंकारी, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, फाजील शेख, पत्रकार प्रा. विनोद नागपूरकर, सिराज पठाण, कैलाश उईके, राकेश चव्हाण, बालू रहांगडाले, सादिक शेख, आदि हजर होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फौंडेशनचे फलिंन्द्र मांडवे, राहूल पाटणकर, भूषण बोरकर, मुकेश लाळे, अमित ठाकरे, मनिष मेश्राम, सुमेध रामटेके, गोविंद बोरकर, मूकेश बोरकर, नितेश नखाते, विष्णू कांबळे, अतूल अंबादे, बाळाजी नखाते , परमानंद सहारे, चंदू बनसोड, यानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा . विनोद नागपूरकर यांनी केले.

यावेळी रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल संकल्प फाउंडेशनचे कर्ता करविता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश बोरकर यांचा सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!