कुरखेडा तालुक्यातील मका खरेदी- विक्री उपाययोजना संदर्भात पदाधिकारी, अधिकारी, व शेतकरी यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
कुरखेडा :- कुरखेडा तालुक्यातील मका खरेदी संदर्भात समस्या दूर करून केंद्र सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील मका खरेदी केंद्रावर अधिकारी, पदाधिकारी, व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली. या नियोजन बैठकीला कुरखेडा उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर, कुरखेडा प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव, कुरखेडा नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबारे, आदिवासी विकास महामंडळ संचालक गोपाल उईके , संचालक यशवंत चौरीकर, कुरखेडा अविका कुरखेडा अध्यक्ष बाबुराव तुलावी, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये, गोठणगावचे संचालक हिराजी माकडे, जिल्हा सहकारी बोर्ड अध्यक्ष वसंतराव मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद खुणे हेमंत शेंद्रे कुरखेडा आविका संचालक शालिक मेश्राम, पुंडलिकराव निपाणे, काशिनाथ पुडो, मोनेश मेश्राम, अविका कुरखेड्याचे व्यवस्थापक लीलाधर घोसेकर, रामकृष्ण मुंगणकर,आविका संचालक मडावी, सचिन झोडे, राजू मडावी, गोदामपाल भाऊराव टेभूने, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी वैशालीताई होले मरसकोल्हे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व शेतकरी आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये विविधविषयासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत चर्चा दरम्यान कुरखेडा तालुक्यात काही आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मका खरेदी प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानुसार कुरखेडा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा अंतर्गत मका शासकीय खरेदी केंद्र मंजूर आहे. या मंजूर असलेल्या मका खरेदी केंद्रावर कुरखेडा आविका केंद्रामध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना सोमवार व मंगळवारी, अविका केंद्र गोठणगाव येथे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बुधवारी व गुरुवारी, कढोली केंद्रामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी तर गेवर्धा केंद्रामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी ,या दिवशी मका विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही व्यवस्था कुरखेड्यातील पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामामध्ये करण्यात येणार येणार असून खरेदी केंद्रावर दोन काटे सुद्धा लावण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेतकरी यांनी मका खरेदीसाठी पुरेशी गोदाम व्यवस्थेची आवश्यकता असून संबंधित विभागाने गोदामची व्यवस्था करावी .बारदान्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच मका खरेदीचा लक्षांक वाढवावा. तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका नोंदणी झाली असून मका केंद्र वाढवावी विक्री झालेल्या मकाचे त्वरित हुंडी काढून चुकारे त्वरित जमा करावे अशी मागणी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांनी मका खरेदी केंद्र सुरू करावी अशी वारंवार मागणी शेतकरी बांधवाकडून होत असल्याने या अनुषंगाने आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घेत जिल्ह्यातील पहिला मका खरेदी केंद्र कुरखेडा येथे सुरु करून दिलासा दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

