10 Jun 2026, Wed

“भर उन्हाळ्यात दर्शनी माल येथील समस्त गावकऱ्याचे बेहाल”.

गट ग्रामपंचायत दर्शनी माल येथे चार महिन्यापासून टाकीच्या नळाचं पाणी पूर्णपणे बंद… 

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. 

गडचिरोली :- तालुक्यातील 18 किमी अंतरावर असलेले मौजा दर्शनी माल गट ग्रामपंचायत येथील मागील चार महिन्यांपासून टाकीच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत.

गावातील अनेक कुटुंबांना दैनंदिन वापरासाठी विहीर, हँडपंप वरून खूप दूरवरून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी उपलब्ध असलेले पाणीही अपुरे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार संबंधित ग्राम अधिकारी,प्रशासक ग्रामपंचायत दर्शनी माल यांना वारंवार सूचना देवून सुद्धा अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. व एकीकडे भारत सरकार जल जीवन मिशन योजना राबवित आहे मात्र दर्शनी माल गावात फक्त कागदावर दिसतं आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि काही गावामध्ये मुख्यमंत्री पंचायतराज अभियान मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे मात्र दर्शनी माल गावात साधा स्वच्छता अभियान सुद्धा राबविले नाही. जिकडे तिकडे कचराच कचरा, नाली पूर्णपणे भरून प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे. पण प्रशासकीय अधिकारी झोपेतच आहेत. त्यातच कळकळीचा उन्हाळा चालू आहे आणि चार महिने होऊन टाकीच नळाच पाणी नाही त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांनी पाणी प्यायचं कुठलं आणि अंगोळ करायच का नाही?असे प्रश्न निर्माण होत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टाकीच्या नळाच पाणी तातडीने उपाय योजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देवून संबंधित ग्रामपंचायत अधिकऱ्यावर कारवाही करण्यात यावी जेणे करुन ग्रामस्थ पाण्यापासून वंचीत राहणार नाही. आणि गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!