28 Oct 2026, Wed
Breaking

!! लोकशाही दिन सभा रद्द !!..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका):- महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारी जिल्हास्तरावरील लोकशाही दिन सभा सध्या आयोजित करण्यात येणार नाही.

दिनांक १८ मे २०२६ पासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत जिल्हास्तरावर लोकशाही दिन सभा घेण्यात येणार नाही.

आचारसंहिता संपल्यानंतर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार लोकशाही दिन सभेचे आयोजन पूर्ववत करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!