ऑटो रिक्षा संघटना व ई रिक्षा संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली :- गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि रिक्षा बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज पारंपरिक ऑटो रिक्षा संघटना व ई-रिक्षा संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत सविस्तर चर्चा केली. प्रवाशांची सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि दोन्ही संघटनांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा, या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता, दोन्ही संघटनांमध्ये उत्तम ताळमेळ राहावा यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त उपस्थितीत हा समन्वय घडवून आणला आहे. रिक्षा चालक-मालक बांधवांच्या रोजगाराला बाधा न येता नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यावर चर्चा केली. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, प्रादेशिक परिवहन विभागाचे श्री. जाधव, अक्षयजी सोळंकी, वाहतूक विभाग शाखेचे मेश्राम उपस्थित होते.

