12 Sep 2026, Sat

“कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे”..

दोन दिवसांतच बांधकामाला तडे ; बांधकामाची चौकशी होणार का?

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली / कोटगल :- केंद्र सरकारच्या निधीतून गडचिरोली शहराला लागूनच असलेल्या मौजा कोटगल (ग्रामपंचायत) येथे सध्या रस्ते आणि नालीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे.  मात्र, या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सार्वजनिक कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत आहे.

नेमकी तक्रार काय ? ___ 

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित नकाशातील मापापेक्षा नालीचे रुंदीकरण कमी ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही, तर सिमेंटच्या बांधकामासाठी जेवढी पाण्याची (क्युअरिंग) आवश्यकता असते, ती दिली गेली नाही. परिणामी, काम पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच नालीच्या भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत.

नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केंद्र सरकारच्या निधीचा अशा प्रकारे दुरुपयोग होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची त्वरित पाहणी करून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी कोटगलमधील सजग नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!