10 Jun 2026, Wed

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर…

विकासकामांचा आढावा, गावांना भेटी आणि आत्मसमर्पित नक्षलवाद्यांशी साधणार संवाद..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली (जिमाका) दि.05:- राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल हे ६ व ७ जून २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. तसेच नक्षलविरोधी उपाय योजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन प्रकल्पालाही भेट देणार आहेत.

दोन दिवसीय दौरा कार्यक्रमानुसार मुख्य सचिव ६ जून रोजी सकाळी नागपूरहून गडचिरोलीकडे प्रस्थान करून जिल्ह्यातील विविध गावांना व विकासकामांच्या स्थळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर त्यांचा गडचिरोली येथे मुक्काम राहणार आहे.

७ जून रोजी सकाळी १०.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नक्षलविरोधी कारवायांबाबत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत विकासकामे, सुरक्षा उपाययोजना आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक झाल्यानंतर मुख्य सचिव आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या नवजीवन वसाहतीला भेट देणार आहेत. येथे ते आत्मसमर्पित माजी नक्षलवाद्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुनर्वसन उपक्रमांची माहिती घेणार आहेत. सायं. ४.४५ वाजता मुख्य सचिव नागपूरकडे प्रस्थान करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!