10 Jun 2026, Wed

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार नाही शेतकऱ्यांचा निर्धार.

जमीन अधिग्रहनाविरोधात हजारो शेतकऱ्यांचा बैल-बंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर ठिय्या आंदोलन..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी करीता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे.  तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी 13 गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहे. या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही. तसेच, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही, त्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आंदोलनात संबंधित गावातील हजारो शेतकरी बांधव आपल्याला परिवारासह बैलबंडी व संपूर्ण शिधा पाणी घेऊन महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलनावर बसले आहेत.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी घेतला आहे. या आंदोलनात काँग्रेस शिवसेना रिपब्लिकन पार्टी वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी सह तेली समाज कुणबी समाज कलार समाज मुस्लिम समाज बांधव डॉक्टर असोसिएशन व इतरही सामाजिक संस्था संघटना व समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आलेला आहे. या ठिय्या आंदोलनात शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम यांच्यासह शेतकरी दिवाकर निसार, शेतकरी डॉ. अनंता कुंभारे, अनिल कोठारे, सुनील कोहपरे, सुभाष कोठारे, रमेश मडावी, रामदास कुकुडकर, गुरुदास ठाकरे, सुभाष किरंगे, कैलास बांबोडे, मयूर मेश्राम, विवेक खोब्रागडे, राजू सातपुते, कैलास सातपुते,चरणदास पोरटे,पंकज भोयर,भास्कर नरुले, दिगंबर चापडे,मीनाताई आभारे, सोमा बाई कळसकर, विद्या दुग्गा, आरती कोहळे,तनुजा कुमरे, निराशा गेडाम, माधुरी बांबोडे, शालू निकुरे, उज्वला निकुरे,अर्चना निकुरे,रेखा निसार, यशोदा बोरकुटे,वैशाली निकुरे, शोभाबाई निकुरे, दर्शना निकुरे, सखुबाई मांदाळे, रचना जुवारे, लता जुवारे तसेच माजी जि प.उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे,आरपीआय नेते रोहिदास राऊत, शिवसेना नेते सुनील केदारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, शिवसेना युवाप्रमुख पवन गेडाम, कम्युनिस्ट पार्टीचे पार्टीचे अमोल मारकवार, BSP नेते मेश्राम जी सह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव महिला युवक नागरिक या ठिय्या आंदोलनास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!