10 Jun 2026, Wed

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका) दि.08:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत, दिनांक 14 जुन 2026 रोजी महाराष्ट्र गट-ब संयुक्त पुर्व परिक्षा 2026 ही परिक्षा गडचिरोली येथील 19 परिक्षा उपकेंद्रावर (शाळा/महाविद्यालयांत) सकाळी 11.00 ते 12.00 पर्यंतच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, नितिन गावंडे यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या 200 मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.

परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परिक्षार्थी व परीक्षार्थी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे परिसरात परीक्षर्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल. असे कृत्य करण्यात येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी.

  • सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांक 14 जुन 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते दुपारी 12.00 वाजेपर्यत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली नितीन गावंडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!