जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सर्वांग विकास अधिकारी आरमोरी यांच्याकडे (प्रशासक) अलका कुकडकर यांची मागणी..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे (मुख्य संपादक)..
आरमोरी / इंजेवारी:- महोदय, उपरोक्त विषयान्वये सविनय निवेदन आहे कि, मी खाली सही करणारी सौ. अलकाताई कुकडकर प्रशासक ग्रामपंचायत इंजेवारी त. आरमोरी येथील रहिवाशी असून आमच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी कु. विशाखा रामटेके यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार केल्याची बाब निदर्शनास आणून देत आहे.
सदर ग्रामपंचायत अधिकारी यांनी खालील प्रमाणे गैरव्यवहार केलेले आहेत.
१) ग्रामपंचायतीच्या विकासकामासाठी प्राप्त झालेल्या निधीचा नियमबाह्य वापर करण्यात आलेला आहे.
२) बनावट व संशयास्पद बिले व खर्च नोंदी तयार करून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आलेला आहे.
३) ग्राम् निधी /पाणीपुरवठा निधी ची वसुली बँकेत न टाकता परस्पर खर्च करून हस्तरोख बाळगलेली जाहे.
४) ग्रामपंचायतीच्या रोकडवही, खर्च नोंदवही, व बँक खात्यामध्ये तफावत आढळून येत आहे.
5) खरेदी प्रक्रिया व कामकाजामध्ये शासनाचे वित्तीय नियमाचे उल्लंघन करण्यात आलेले आहे.
६) मासिक सभेत नियमबाह्य ठराव घेणे.
७) सभाध्याक्षाचे मासिक सभेत मत न नोंदविणे.
८) 5% दिव्यांग निधीमध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणत लाभ दिलेला नाही
९) १०% महिला व बाल कल्याण या योजनेत बाजारभावापेक्षा जड दर लावून जास्त खर्च करण्यात आलेला आहे.
१०) १५% मागासवर्गीय खर्च करतांना नियमाला डावलून खर्च केलेला आहे.
११) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेत लोकवर्गणी प्रत्यक्ष न घेता रोकडवहीवर लोकवर्गणी नोंदवून दिशाभूल केलीली आहे.
तरी आपणास विनंती आहे कि, कु. विशाखा रामटेके ग्रामपंचायत अधिकारी, यांची ग्रामपंचायत इजेवारी येथील कालावधीची सखोल चौकशी करून संबंधित कागदपत्रे, बिले मोजमाप पुस्तिका, रोकडवही, व बँक व्यवहार यांची तपासणी करण्यात यावी दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, हि विनंती..
सौ. अलकाताई कुकडकर
प्रशासक, ग्रामपंचायत इंजेवारी, ता. आरमोरी..
प्रति, गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली.
विषय :- कु. विशाखा लखोपती रामटेके ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत इंजेवारी ता. आरमोरी यांच्या आर्थिक गैरव्यवहारााबाबत चौकशीन करुन कारवाई करण्याबाबत.
संदर्भ :- 1. सौ अल्काताई कुकडकर प्रशासक ग्रामपंचायत इंजेवारी पंचायत समिती आरमोरी यांचे निवेदन दिनांक 25.05.2026 प्राप्त दिनांक 08.06.2026.
2. कार्यालयीन आदेश क्रमांक/जिपग/साप्रवि/पंचा./स्था.08/1235/2026. दिनांक 25.05.2026.bसंदर्भीय पत्रान्वये सौ. अल्काताई कुकडकर, प्रशासक ग्रामपंचायत इंजेवारी, पंचायत समिती आरमोरी यांनी या कार्यालयास तक्रार निवेदन सादर केलेले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 2 चे आदेशान्वये जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या ग्रामपंचायतीचे सखोल व सर्वसाधारण निरीक्षण करण्याबाबत निर्देश दिलेले आहे व सदर पंचायत समिती आरमोरीचे सखोल तपासणी करीता आपल्या पथकाची नेमणुक करण्यात आलेली आहे.
सबब, सदंर्भ क्रमांक 1 चे निवेदनास प्राधान्याने काम हाती घेऊन नमुद बाबींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल सदर पत्र प्राप्त होतांच 15 दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावा.
सहपत्र – संदर्भीय पत्र/निवेदन.
(पकंज के भोयर) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं.) जिल्हा परिषद, गडचिरोली.
प्रतिलिपी :- 1. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना माहितीस सविनय सादर.
2. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद, गडचिरोली यांना माहितीस सस्नेह अग्रेषित.
3. गट विकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांना माहितीस अग्रेषित. आपण नेमुण देण्यात आलेल्या पथकास आवश्यक ते संपुर्ण सहकार्य करावे.
