24 Jun 2026, Wed

गडचिरोली जिल्ह्यातील (उबाटा गट) शिवसेना पदाधिकारी जाहीर. ; पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख पदी निवड ; 

महेश केदारी जिल्हासंपर्कप्रमुख पदी कायम ; डॉ. श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड..

पवन गेडाम यांना गडचिरोली, आरमोरी विधानसभा, तर दिलीप सुरपाम यांना अहेरी विधानसभेचा पदभार..

न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी..

गडचिरोली, दि. ११ :– शिवसेना (उबाटा गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महेश केदारी यांच्याकडे संपर्कप्रमुख पद कायम असून डॉ. श्रीकांत बनसोड यांची सह- संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गडचिरोली जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल. पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गेडाम यांचे कार्यक्षेत्र गडचिरोली व आरमोरी विधानसभा तर सुरपाम यांचे कार्यक्षेत्र अहेरी विधानसभा असेल. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम व डॉ. श्रीकांत बनसोड यांनी या निवडीचे श्रेय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, महेश केदारी, शिवसेना पदाधिकारी यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!