24 Jun 2026, Wed

गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघ राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना…

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत निवड झालेला गडचिरोली जिल्ह्याचा संघ जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना होत आहे. सदर स्पर्धा दि. १० ते १५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :-

कब्स क्लास मुले (U-11)

१) कुश राकेश कोहपरे वजन गट २२ ते २४ कि.ग्रॅ.

२) प्रथमेश श्रीकृष्ण जुवारे वजन गट ३० ते ३२ कि.ग्रॅ.

कॅडेट मुले (U-13)

१) राजवीर प्रकाश लेकामी वजन गट ३० ते ३२ कि.ग्रॅ.

कॅडेट मुली (U-13)

१) आध्या यशवंत कुरुडकर वजन गट ३४ ते ३६ कि.ग्रॅ.

सब-ज्युनिअर मुले (U-15)

१) ईशान विनिश भांडेकर वजन गट ३३ ते ३५ कि.ग्रॅ.

२) शिवांश शामराव उसेंडी वजन गट ४३ ते ४६ कि.ग्रॅ.

३) विहान किशोर बोडकर वजन गट ४९ ते ५२ कि.ग्रॅ.

४) अर्पित पंकज धुडसे वजन गट ३० ते ३३ कि.ग्रॅ.

५) धनंजय गुणाजी धोटे वजन गट ५२ ते ५५ कि.ग्रॅ.

सब-ज्युनिअर मुली (U-15) – १) निधी भास्कर गोटा वजन गट ३५ ते ३७ कि.ग्रॅ – २) आदिती गिरीधर बांते वजन गट ४३ ते ४६ कि.ग्रॅ. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक पंकज मडावी यांचे मार्गदर्शन लाभत असून संघटनेचे सचिव यशवंत कुरुडकर, सहसचिव महेश निलेकार व संतोष गैनवार यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाडे, गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपाध्यक्ष जगदीश मस्के, अनिल तिडके, प्रभाताई भरडकर, राजेश प‌द्मगीरवार, राकेश कोहपरे, प्रवीण मेश्राम, श्रीकृष्ण जुवारे, रजत देशमुख, संजय मानकर, अनिकेत नैताम, प्रसाद टेपलवार यांनी संघातील सर्व खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचावतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!