24 Jun 2026, Wed

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (आज )१८ जून रोजी गडचिरोली दौऱ्यावर…

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका) दि.18:- राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यानुसार सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांचे गडचिरोली येथे दुपारी ३ वाजता आगमन व नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री सोयीनुसार गडचिरोलीहून रामटेककडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!