24 Jun 2026, Wed

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ; २३ वा हप्ता लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ; २३ वा हप्ता लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका) दि.18:- पंतप्रधान यांच्या हस्ते शनिवार, दि. २० जुन २०२६ रोजी तारकेश्वर, हुगळी, पश्चिम बंगाल येथून पी. एम. किसान योजनेतील लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात योजनेच्या 23 व्या हप्त्याचा लाभ एक क्लिकवर वितरण होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रु.2000/- चा लाभ राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल. त्या अनुषंगाने सदर समारंभामध्ये तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), ग्रामस्तरावर हा कार्यक्रम स्थानिक कृषि व महसुल विभागाच्या अधिकारी, सहकारी पत संस्था (PACS) याठिकाणी सदरचा समारंभ आयोजित करून सदर समारंभ यशस्वी होण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंक चा वापर करून स्थानिक जास्तीत जास्त शेतक-यांना ऑनलाइन पद्धतीने सहभागी करून घेणे बाबत आवाहन श्रीमती. प्रीती हिरळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

लिंक – https://pmindiawebcast.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!