24 Jun 2026, Wed

मन्नेराजाराम येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर उत्साहात संपन्न..

न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी भामरागड..

भामरागड :- भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात मन्नेराजाराम व परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचाराचा लाभ घेतला.

या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख आयोजक सुरज तलांडे ग्रामपंचायत सदस्य (जोनावाही) हे होते. कार्यक्रमासाठी मा. इंदरशहाजी मडावी (मन्नेराजाराम), माजी समाजकल्याण सभापती, जिल्हा गडचिरोली, तसेच तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (भामरागड) व माजी पंचायत समिती सदस्य यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इसपती मडावी (जोनावाही) – पेसा अध्यक्ष, सुरेश मडावी (मरमपल्ली), राजेश तलांडे (गंगारामपेठा), राहुल आत्राम (जोनावाही), संकर सिडाम (गेर्रा), महेश कोळपे (गंगारामपेठा), महेश सडमेक, राजेश मडावी, साईनाथ दुर्गे, विरून तोडसाम व कुमारी सारिका मडावी, व कुमारी सीमा मडावी, व कुमारी मोनिका मडावी, व तसेच इतर अनेक सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक व उपस्थित नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!