न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी आलापल्ली / अहेरी..
गडचिरोली, (जिमाका) दि.18:- नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता/उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली, व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक. 20 जून 2026 रोजी वेळ सकाळी 10.00 वाजल्या पासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ( प्लेसमेंट ड्राईव्ह ) चे आयोजन करण्यांत आले आहे. सदर रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपन्या उपस्थित राहणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी कंपन्या सहभागी होणार असून विविध पदांसाठी एकुण 643 रिक्त जागांसह उपस्थित राहणार आहेत. एकुण 10 पदांसाठी कमाल वय 18 ते किमान 50 वयोगटातील 10वी 12 वी पास / नापास , आयटीआय पास ,डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण सर्व बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यांत येणार आहे. तरी सर्व बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. गडचिरोली जिल्हयातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी विविध पदांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन मुलाखती द्याव्यात व पात्र उमेदवारांनी रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावीत. त्याकरीता मंगळवार दिनांक 20 जून 2026 रोजी स.10.00 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली येथे आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी आपल्या बायोडेटा /रिज्युम व सर्व आवश्यक कागदपत्रासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार मेळाव्याच्या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती व संपर्काकरीता या कार्यालयाच्या gadchirolirojgar@gmail.com वर व 7843048249 / 8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.
