24 Jun 2026, Wed

स्वाधार योजनेच्या Send Back व Move to Swadhar (स्वाधार योजनेकडे वर्ग) स्थितीतील अर्जांसाठी 07 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ..

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. सचिन मडावी यांचे आवाहन..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका) दि.19: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी मागील शैक्षणिक वर्षातील Send Back व Move to Swadhar (स्वाधार योजनेकडे वर्ग) स्थितीमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी, त्रुटींची पूर्तता व अर्ज निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर दि. 16.06.2026 ते दि. 07.07.2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर मुदतवाढीचा लाभ घेऊन संबंधित पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनींनी आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करावीत. तसेच अर्जाची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जातील सर्व त्रुटी दूर करणे आवश्यक असून, मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर प्रलंबित राहिलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी दि. 07.07.2026 पूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जातील आवश्यक दुरुस्ती / त्रुटीपूर्तीसाठी जुनी वेबसाईट https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!