अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने विस्तार अधिकारी निलंबित..
न्यू विदर्भ केसरी / मुख्य संपादक Newvidarbhakesari.com
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार दिव्यांगांसाठीचे वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्यात आलेले असतानाही, मुदत संपूनही जुन्याच प्रमाणपत्राच्या आधारे सवलतीचा लाभ घेणाऱ्या पंचायत समिती गडचिरोली येथील शिक्षण विस्तार अधिकारी संगीता खोब्रागडे यांना ६ जून रोजी निलंबित करण्यात आले आहे.
संगीता खोब्रागडे यांनी सन २०२३ पासून बदलीमधून सूट मिळण्यासाठी या दिव्यांग सवलतीचा लाभ घेतला होता. मात्र त्यांनी नवीन युडीआयडी कार्ड सादर केले नाही. परिणामी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ६ जून रोजी आदेश काढून त्यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत खोब्रागडे यांचे मुख्यालय पं.स. कुरखेडा येथे आहे.
