27 Oct 2026, Tue
Breaking

मालेवाडा येथे अपर तहसील कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव ; हरकती व सूचना आमंत्रित..

न्यू विदर्भ केसरी..

गडचिरोली, (जिमाका) दि.24: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे नवीन अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत नागरिक, ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मालेवाडा व पुराडा महसूल मंडळांतील गावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. या कार्यालयाच्या निर्मितीबाबत अथवा प्रस्तावित गावांच्या समावेश-विभाजनाबाबत कोणाला आक्षेप किंवा सूचना असल्यास त्यांनी प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, कुरखेडा कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींची दखल घेतली जाणार नसून, त्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी किरण वागस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!