३० जूनपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा ; १ जुलै पासून दंडात्मक कारवाई..
न्यू विदर्भ केसरी..
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक केले आहे. या कामासाठी शासनाने दिलेली मुदत ३० जून २०२६ रोजी संपत असून १ जुलै २०२६ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सर्व शासकीय तसेच खासगी वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ज्यांनी HSRP बसविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेली असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तत्काळ नोंदणी करून HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
