27 Jul 2026, Mon

!! होप फॉउंडेशन सिरोंचा तर्फे एकल महिलांच्या गौरव !!

होप फाऊंडेशन सिरोंचा आणि ग्रामपंचायत अंकिसा यांचा सयुक्त उपक्रम..

न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी..

सिरोंचा :- 23 जून हा जागतिक एकल महिला दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला आहे. त्यानिमित्ताने महिला व बालविकास विभाग गडचिरोली, होप फॉउंडेशन सिरोंचा आणि ग्रामपंचायत अंकिसा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23/6/2026ला ग्रामपंचायत अंकिसा ता सिरोंचा येथे जागतिक एकल महिला दिन आयोजित करण्यात आले. एकल महिला चांगला काम करणाऱ्या अंकिसा येथील एकल महिला श्रीमती सोनाली नल्ला आणि श्रीमती राजमणी कोठारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश कोंडावार ग्रामसेवक, प्रभाकर शानगोंडा माजी जी. प. सदस्य, संजू पांडवला (शिपाई), सुरेश नगोडी (पाणीपुरवठा कर्मचारी), बापू पोटलापेल्ली (लिपिक), राजमनी येतम (अंगणवाडी सेविका), संतोष कोंडी (प्रतिष्ठित नागरिक) होप फॉउंडेशन सिरोंचाचे सामाजिक कार्यकर्ता शौकत सय्यद उपस्थित होते.

यावेळी उपस्थित एकल महिलांना बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार आणि इतर शासकीय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता शौकत सय्यद तर आभार प्रदर्शन सुरेश नगोडी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!