27 Jul 2026, Mon

आव्हान हायस्कूल, आंधळी फाटा येथे इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

कुरखेडा :- बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा संचालित आव्हान हायस्कूल, आंधळी फाटा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून संस्थेच्या जेष्ठ सदस्या श्रीमती चित्रलेखा मेश्राम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. डी. के. सोनवाने होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. कृपाल मेश्राम तसेच संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ. प्रियंका मेश्राम उपस्थित होत्या. यावेळी श्री जे. आर. म्हस्के, श्री. के. सी. मेश्राम आणि श्रीमती सी. आर. वालदे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात नियमित अभ्यास करून उत्कृष्ट यश संपादन करावे, वाचनाची सवय जोपासावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक अडथळा न येता अभ्यासाला त्वरित सुरुवात करता येणार आहे. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!