10 Jun 2026, Wed

सी-६० जवानाच्या पत्नीचा विषारी पावडर प्राशन केल्याने मृत्यू..

गडचिरोलीत खळबळ : सी-६० जवानाच्या पत्नीचा विषारी पावडर प्राशन केल्याने मृत्यू..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- महाराष्ट्र दिनी गडचिरोली शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहितेने विषारी पावडर प्राशन केल्याने, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेचा तपशील___ मृत महिलेचे नाव सोनाली रवींद्र उसेंडी (वय ३० वर्ष) असून, त्या गडचिरोलीच्या विशेष सी-६० दलात कार्यरत असलेले जवान रवींद्र उसेंडी यांच्या पत्नी होत्या. प्राप्त माहितीनुसार, १ मे रोजी सोनाली यांनी राहत्या घरी तांदळात टाकण्याचे विषारी पावडर पाण्यात मिसळून प्राशन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल केले.

उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली__ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनाली यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलीस तपास सुरू__ या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ आणि रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात ‘मर्ग’ दाखल करण्यात आला आहे.

सोनाली उसेंडी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत असून, लवकरच घटनेमागील सत्य समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!