10 Jun 2026, Wed

राजाराम (खां) पोलिस उप निरीक्षक आंनद आवारे यांना उल्लेखनीय पदक जाहीर.

न्यू विदर्भ केसरी / अहेरी तालुका प्रतिनिधी..

राजाराम (खां):- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या राजाराम उप पोलीस स्टेशनंचे पोलीस उपनिरीक्षक आंनद आवारे यांनी गडचिरोली सारख्या अति संवेदनशील आणि आव्हानात्मक क्षेत्रात आपण केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. कठीण परिस्थितीतही धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा न गमावता आपण जी उल्लेखनीय कामगिरी बजावली, ती प्रत्येकासाठी आदर्श ठरावी अशी आहे. आपल्या कार्यातून समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून अनेकांना नवी आशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या माननीय पोलिस महासंचालकांकडून DG INSIGNIA”(महानिदेशकांचे ) हे सन्मानचिन्ह त्याचा अथक परिश्रमांचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल झाले आहे.

आपल्या या गौरवपूर्ण यशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! भविष्यातही आपण अशीच प्रामाणिक सेवा देत राहून समाजाच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहाल, हीच अपेक्षा. आपल्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक युवक देशसेवेसाठी पुढे येतील, याची खात्री आहे.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभो, हीच मनापासून प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!