सर्व गुणवंत आणि उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षाव..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
रांगी / मोहली:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला.सदर परीक्षेमध्ये जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, मोहली येथील कला/विज्ञान शाखेचे एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ८८ विद्यार्थी परीक्षेला उत्तिर्ण झाले.त्यामुळे या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९१.६६ लागलेला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही सदर महाविद्यालयांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.कला शाखेतून ७०.३३% गुणांनी उत्तिर्ण होऊन सुप्रिया शालीकराव वड्डे हीने महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक पटकाविला. तर रिया राजेंद्र निकुरे हीने६८.६७%गुण मिळवून द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्राप्त करत रविना सुभाष शेंडे ६४.५०%गुण मिळविले.त्यासह विज्ञान शाखेतून ६०.३३%गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक येण्याचा मान ज्ञानेश्वरी तुळशिदास बहयाळ हीने मिळविला.तर ६०.००%गुणांनी उत्तिर्ण होऊन आशितोष रामदास हलामी याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.तसेच श्रीकांत श्रीनिवास पब्बावार याने ५८.५०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.सर्व गुणवंत आणि उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

