दिना धरण जलाशया जवळील म. सा. कन्नमवार इको पार्कचा सर्वांगीण विकासा करीता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावे ?
!! राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी!!
चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील दिना धरणाला लागून असलेले निसर्ग रम्य पर्यटन स्थळ म.सा. कन्नमवार इको पार्क गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. या ठिकाणी 2014 -15 साली वन विभागाचे व राज्य सरकारचे वतीने विविध विकास कामे करण्यात आली होती. परंतु वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सदर इको पार्क धुळखात आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक सोयी सुविधा नसल्याने येत नाही येथे आधी तयार करण्यात आलेली विविध शोभेची वस्तू चोरीला गेलेली आहे. अथवा खूप जीर्ण झालेली आहे, विविध शोभिवंत वस्तू टूट फूट अवस्थेत आहेत. सदर इको पार्कचा विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटकांना या ठिकाणी चांगला निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेता येऊ शकतो. या ठिकाणी तत्कालीन वेळेस जिल्ह्यातील शेकडो पर्यटक दररोज येत होते, परंतु या ठिकाणांच्या दुर्लक्षितपणामुळे येथे पर्यटक येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येत आहे?
वन विभागाने सदर क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रामुख्याने या ठिकाणी पर्यटनासाठी आवश्यक असलेले मूलभूत सोयी सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावे, प्रामुख्याने वाल कंपाउंड, स्वच्छता गृह, उपहारगृह विश्रामगृह,अंतर्गत रस्ते, नाली, बारमाही चौकीदार व विविध सौंदर्यकरण विकास कामाकरिता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावी व या विषयासाठी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा प्राधान्याने पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये,किशोर कुंडू, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, महेश विस्वास, लीना विश्वास, विशाखा सिंह व येथील स्थानिक मानवाधिकार संघटन पदाधिकारी सुमेन विश्वास, सुकंठ रॉय, पलाश घरामी, विनोद किरमे, राजू सातपुते, रमेश लेकलवार, संदीप भोवरे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केली.

