माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नातून सभा मंडप मंजूर ! भूमिपूजन करतांना माजी आमदार गजबे आणि सुरेंद्र सिंह चंदेल आणि पदाधिकारी, कार्यकर्ते..
फुलचंद वाघाडे / न्यू विदर्भ केसरी..
कुरखेडा :- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुरखेडा शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या मुख्य गांधी चौकात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाच्या बांधकामास अखेर मंजुरी मिळाली असून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या शुभहस्ते नुकताच भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी शिवसेना गडचिरोली संघटक सुरेंद्रभाऊ चंदेल, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अनिताताई बोरकर, उपाध्यक्ष बबलूबाई हुसेनी, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये , उद्धवसेना तालुकाध्यक्ष आशिष काळे, शिंदेसेना तालुकाध्यक्ष अनिकेत आकरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, न. प सभापती सागर निरंकारी, ज्येष्ठ नगरसेवक रामभाऊ वैद्य, नगरसेवक ऍड उमेश वालदे , नगरसेवक जयेंद्रसिंग चंदेल, उपविभागीय अभियंता अनिल गिळणारे, शाखा अभियंता पाल, खुशाल बनसोड, तुषार कुथे , बंटी भट्टळ, दिनेश भट्टड, राहुल ठोंबरे, अशोक माकीजा, अनिल सचदेव, पत्रकार राकेश चव्हाण, उल्हास देशमुख तसेच नागरिक व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधी चौक परिसरात सभा मंडप उभारण्यात यावा, अशी मागणी कुरखेडावासीयाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून विशेष पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणले. त्यामुळे आता शहराच्या मध्यभागी नागरिकांसाठी सुसज्ज सभा मंडप उपलब्ध होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामाला मंजुरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल उपस्थित पदाधिकारी नागरिकांनी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

