27 Jul 2026, Mon

अखेर खरपी (टेंभाचक) गावातील बंद हातपंप दुरुस्त ; न्यू विदर्भ केसरीच्या बातमीची दखल..

आरमोरी पंचायत समितीचे बिडिओ मंगेश आरेवार यांचा पुढाकार ; काल बातमी आज हातपंप दुरुस्त..
गावकऱ्यांनी मानले प्रशासनाचे आभार..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे मुख्य संपादक…

आरमोरी :- तालुक्यातील ग्रामपंचायत वडधा अंतर्गत खरपी (टेंभाचक) गावातील बसस्टॉप जवळील अनेक महिन्यांपासून बंद असलेला हातपंप अखेर आज दिनांक 13 मे 2026 रोजी दुरुस्त करण्यात आला असून गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर हातपंप हा मुख्य मार्गावर (बसस्टॉप), व परिसरातील अत्यंत वापरातील व प्रमुख पाण्याचा स्रोत असल्यामुळे त्याच्या बंद अवस्थेमुळे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती.
महिलांना, वृद्धांना व लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत होते, तसेच अपुऱ्या व अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत न्यू विदर्भ केसरीचे मुख्य संपादक फुलचंद वाघाडे यांनी आरमोरीचे बिडिओ मंगेश आरेवार यांना सदर विषयाची बातमी पाठवली आणि लगेच बिडीओ आरेवार साहेब यांनी बातमीची दखल घेतली व फुलचंद वाघाडे यांना सांगितले की, (ok ) आणि लगेच संबंधित कर्मचाऱ्यांना हातपंप तात्काळ दुरुस्त करण्याची सूचना दिली व आज हातपंप दुरुस्त झाले.

त्यामुळे गावकऱ्यांनी आरमोरी पंचायत समितीचे बिडिओ मंगेश आरेवार व फुलचंद वाघाडे यांचे आभार मानले व पाण्याची अडचण दूर झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना व परिसरातील जनतेला या हातपंपाचा पाणी वापरासाठी उपयोग करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!